चपळता, काटकता, वेळेचे महत्व ठसवणार्‍या ‘विवेक रन’ला जोरदार प्रतिसाद
 महा त भा  12-Aug-2017

 

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक सहभागी विजेत्या ७९ विद्यार्थ्यांचे स्मृतीचिन्ह देवून कौतुक  

जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान जळगावच्या वतीने विवेकानंद सार्ध्दशती वर्षापासून ‘विवेक रन’ मॅरेथॉन हा उपक्रम अविरतपणे उत्साहात सुरु आहे. यंदाच्या वर्षीही १२ ऑगस्ट या दिवशी या उपक्रमाला व्यापक स्वरुप देत विवेकानंद प्रतिष्ठान संचलित सर्व शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांसाठी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. खान्देश सेंट्रल मॉल येथून सकाळी ६ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करुन स्पर्धेची सुरुवात झाली असून या स्पर्धेला प्रमुख पाहुणे म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक बच्चनसिंग उपस्थित होते.

इ.५ वी ते ७ वीचा एक गट, इ.८ वी ते १० वीचा एक गट आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा एक गट या पध्दतीने तीन गटात स्पर्धा झाली. या स्पर्धेचा शेवट देखील खान्देश सेंट्रल मॉल येथे बक्षीस वितरणाने झाला.  या स्पर्धेत २००० विद्यार्थी, २५० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

Embeded Object

आयोजनामध्ये केशवस्मृती प्रतिष्ठानचे संचालक व जळगाव रनर्स गृपचे डॉ.रवी हिराणी व त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा शोभाताई पाटील, संचालिका पुनमताई मानुधने, रत्नाकर गोरे, नंदकुमार जंगले, सर्व विभागांचे विभागप्रमुख व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.


कमालीची शिस्त व उत्साह
श्रावण महिन्यातील प्रसन्न आल्हाददायी वातावरणात भल्या सकाळी ही लहान गटासाठी  ३ कि.मी.लांबीची व मोठ्या गटासाठी  ५ कि.मी.लांबीची स्पर्धा झाली. रनर्स गृपचे पिवळे शर्टमधील धावपटू लक्ष वेधून घेत होते.

वीजेता मुले खालीलप्रमाणे  - 


५ वी ते ७ वी लहान गट - वेदांत योगेश राणे, दीपेश सुनील तायडे, प्रणव मनोहर तपकीरे.

मुलींमध्ये - तनिष्का सुभाष जाधव, कनक शशिकांत पाटील, हंसीका ना.जाहंगीड, इंग्लीश मेडीयम स्कूल - मुकेश विलास बारेला, विशाल सोपान गवळी, मुकेश धाचणे, इनेश कसाया मिलाला, शेखर सत्तार तडवी,

मुलींमध्ये - श्रृती आनंद पाटील, ऋतूजा गोपाल मराठे, सुष्मीता मनोज महाजन, रेणुका मदन रावते.

काशिनाथ पलोड शाळा - मोहित अनिल घुले, उपेंद्र सुनील पाटील, वैभव रवींद्र निमजे, सुमीत निलेश पाटील, कौस्तुभ विलास बारी.

मुलींमध्ये - भक्ती आर.वर्मा, वेणू एन.मोराणकर, शरयू पी.चौधरी, हिमांगी पी.अमोदकर, तेजस्विनी एस.बोरसे.

ब.गो.शानबाग शाळा - हर्षल अवधूत रौंदडणे, मयुर दिनेश पाटील, सुरज मिरसिंग बारेला, धृव महेंद्र सोनेने, मानव प्रमोद पाटील.

मुलींमध्ये - श्‍वेता संजय बोराडे, निशा संभाजी सोनवणे, वेदश्री रणजीत देशमुख, आदिती मनोज पाटील, जान्हवी राजेंद्र पाटील.

श्रवण विकास - प्रणव जोशी, तुषार बिर्‍हाडे, जैद बागवान, तनिष्का परमार. 
८ वी ते १० वी मोठा गट शानबाग शाळा मुले -  सुमीत ईश्‍वर बडगुजर, अभिषेक सुदाम देवरे, आशितोष गिरीश शिंदे.

मुलींमध्ये - राजश्री अतुल मनोहर, मृणाल देवेंद्र महाजन, सुरभी संजय महाले.

इंग्लिश मिडीयम - लोकेश कैलास गव्हारे, जय राजाराम तायडे, पार्थ सुनील खैरनार, यश चौधरी, आयनिश रामटेके.

मुलींमध्ये - अदिती मनोज बोरसे, डिंपल अशोक कोळी, मानसी सचिन घोडेस्वार, मानसी रवींद्र पाटील, देवयानी गजानन वखरे.

काशिनाथ पलोड - नील पाटील, यश पाखले, ओम चौधरी, जिज्ञेश सुर्वे, रुपेश दिवसे

मुलींमध्ये - साक्षी सुनील चौधरी, शीतल चंद्रशेखर नाईक, नताशा दीपक रायसिंघानी, खुशी योगेश मंडोरा, मयुराक्षी राजेंद्र खाडायते.

ब.गो.शानबाग - गौरव कैलास पाटील, विशाल राजेंद्र चौधरी, ललीत महेश भोळे, निशांत राजेंद्र चौधरी, प्रतिक संजय जोशी.

मुलींमध्ये - रेणु मिरसिंग बारेला, नेहा जयंत खडके, स्नेहल किशोर बाविस्कर, साक्षी जितेंद्र जोशी, सृष्टी प्रमोद पाटील.

श्रवण विकास - बुध्दभुषण गवळे, भुषण इंगळे, गौरव सोनवणे,

मुलींमध्ये - पल्लवी चव्हाण यांचा समावेश आहे.