संसदेच्या इतिहासातील सर्वाधिक सक्रीय १६व्या अधिवेशनाचा आज समारोप
 महा त भा  11-Aug-2017

 

अनिश्चित काळासाठी पावसाळी अधिवेशनाचा समारोप - अनंतकुमार

 

नवी दिल्ली: अनिश्चित काळासाठी संसदेचे कामकाजाचा समारोप झाल्याचे पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज जाहीर केले. संसदेच्या इतिहासातील सर्वाधिक सक्रीय व अधिक उपस्थिती असणारे हे १६वे पावसाळी अधिवेशन होते.

 

संसदेच्या लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये नेमके काय घडले? यावर्षी काही विशेष घडामोडी आणि घटना यामधून समोर येत आहेत का याविषयी जाणून घेऊ या विशेष आढावा.

 

 • १.पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०१७ ते ११ ऑगस्ट २०१७पर्यंत सुरू होते.
 • २.लोकसभेत एकूण १७ विधेयके मांडण्यात आली. त्यातील १४ विधेयकांना संमती मिळाली.
 • ३.राज्यसभेत या अधिवेशनात एकूण ९ विधेयके मांडण्यात आली. ती सर्व ९ विधेयके पारीत करण्यात आली.
 • ४.संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये १६व्या पावसाळी अधिवेशनामध्ये १३ विधेयके पारीत झाली.
 • ५.‘पावसाळी अधिवेशन-२०१७’मध्ये लोकसभेत ७७.९४ टक्के तर राज्यसभेत ७९.९५ टक्के उपस्थिती होती.
 • ६.अधिवेशनाच्या २६ दिवसांच्या कामकाजात १९ सत्र झाली.

 

यावर्षीचे पावसाळी अधिवेशन अनेक चर्चांमुळे गाजले. यामधील विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची उपस्थिती दोन्ही सभागृहांमध्ये समाधानकारक होती. त्यामुळे संसदेत मांडलेल्या विधेयकांवर सविस्तर चर्चादेखील झाली. हे १६वे अधिवेशन त्यामुळेच यशस्वी ठरले असे म्हणता येईल. संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी आज १६व्या पावसाळी अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात वरील निरीक्षणे मांडली.


 


 

 

संसदेतील कामकाजात चर्चा झालेली विधेयकांची संख्या व माहिती पुढीलप्रमाणे -

१.अधिवेशनापूर्वी प्रलंबित असलेले विधेयक - ६३

२.अधिवेशनादरम्यान मांडण्यात आलेली नवीन विधेयके - १७

३.अधिवेशनात मंजूर झालेली विधेयके - १३

४.अधिवेशनात मागे घेण्यात आलेली विधेयके - ३

५.सत्राच्या शेवटी प्रलंबित असलेले विधेयके - ६४

 

दोन्ही सभागृहांमध्ये पारीत झालेली विधेयके पुढीलप्रमाणे -

 • १. फुटवेअर डिझाइन अॅण्ड डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट विधेयक, २०१७
 • २. सेनाधिपती (कार्यवाही आणि समुद्री दावे निकाली काढणे) विधेयक, २०१७
 • ३. सांख्यिकी संकलन (सुधारणा) विधेयक, २०१७
 • ४. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (सुधारणा) विधेयक, २०१७
 • ५. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फर्मेशन टेक्नोलॉजी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) विधेयक, २०१७
 • ६. मोफत आणि सक्तीचे शिक्षण (सुधारणा) विधेयक, २०१७
 • ७. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (सुधारणा) विधेयक, २०१७
 • ८. बँकिंग नियमन (सुधारणा) विधेयक, २०१७
 • ९. अॅप्रोप्रिएशन (नं. ३) विधेयक, २०१७
 • १०. अॅप्रोप्रिएशन (नं. ४) विधेयक २०१७
 • ११. केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विधेयक, २०१७ (जम्मू-काश्मीर विस्तार)
 • १२. एकात्मिक वस्तू आणि सेवा कर विधेयक, २०१७ (जम्मू-काश्मीर विस्तार)
 • १३. पंजाब महानगरपालिका कायदा (चंदीगढ विस्तार) दुरुस्ती विधेयक, २०१७


 


 

संसदेतील खासदारांच्या एकूण उपस्थितीविषयी काही महत्त्वाची माहिती -

 • १. संपूर्ण अधिवेशनात ८० टक्के खासदारांची उपस्थिती होती.
 • २. लोकसभेत भाजपचे ८७%, बीजू जनता दलाचे ८३%, अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघमचे ८१%, शिवसेनेचे ८०%, तेलगु देसमचे ७९ टक्के, काँग्रेसचे ७९ टक्के, तेलंगणा राष्ट्र समितीचे ७० टक्के व तृणमुल काँग्रेसच्या खासदारांची सर्वाधिक कमी म्हणजेच ६५ टक्के उपस्थिती होती.
 • ३. राज्यसभेत भाजप व समाजवादी पक्षाचे सर्वाधिक ८८% खासदार उपस्थित होते. त्यानंतर काँग्रेसचे ८५ खासदार%, जनता दल युनायटेडचे ८१%, अण्णा द्रमुक मुन्नेत्र कळघमचे ७८ टक्के तर तृणमुल काँग्रेसचे ७० टक्के खासदार अधिवेशन काळात उपस्थित होते.
 • ४. उत्तर भारतातून ८६ टक्के तर दक्षिण भारतातून ७८ टक्के खासदारांनी लोकसभेत उपस्थिती दाखवली. यामध्ये ४० ते ७० वर्षे वयोगटातील खासदार अधिक संख्येने उपस्थित होते. विभागवार आढावा घ्यायचा झाल्यास उत्तरेकडील सर्वाधिक ८६ टक्के खासदार लोकसभेत उपस्थित होते. त्यानंतर पश्चिमेकडील ८१ टक्के, दक्षिणेकडील ७८ टक्के तर सर्वांत कमी ७९ टक्के पूर्वेकडील खासदार लोकसभेत उपस्थित होते.

 

 • ५. राज्यसभेत ७५ टक्के महिला खासदार तर ८० टक्के पुरुष खासदार उपस्थित होते.
 • ६. राज्यसभेत ५५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्या खासदारांनी सर्वाधिक उपस्थिती दाखवली. ७० वर्षेपेक्षा अधिक वयाच्या ८२ टक्के खासदारांनी संसदेच्या विविध सत्रांमध्ये भाग घेतला.
 • ७. राज्यसभेत उपस्थित राहणाऱ्यांमध्ये उत्तरेकडील ८५ टक्के, त्यानंतर पश्चिमेकडील ८३ टक्के, दक्षिणेकडील ७९ टक्के तर पूर्वेकडील ७६ टक्के खासदार होते.
 • ८. ५५ ते ७० वर्षे वयोगटातील खासदारांनी लोकसभेतील वादविवादात सातत्याने भाग घेतला. पश्चिम व दक्षिणेकडील राज्यांच्या खासदारांनी मोठ्या प्रमाणात चर्चेत सहभाग घेतला.
 • ९. राज्यसभेत ४० हून कमी वयाच्या खासदारांनी मोठ्या संख्येने वादविवादात सहभाग घेतला. विभागवार विचार केल्यास दक्षिणेतील व पूर्वेकडील खासदार अधिक सक्रिय होते.
 • १०. पश्चिमेकडील राज्यांमधील खासदारांनी विविध चर्चांमध्ये सर्वाधिक वेळा प्रश्न उपस्थित केले. त्याचवेळी उच्चरेकडील खासदार मात्र सर्वांत कमी वेळा प्रश्न उपस्थित करताना आढळले.