भारत नेपाळला मदत करू इच्छितो: सुषमा स्वराज
 महा त भा  11-Aug-2017

 

काटमांडू: भारत देश नेपाळला नेहमीच मदत करू इच्छितो तसेच नेपाळमध्ये शांतता, सुव्यवस्था राहावी अशी इच्छा भारत नेपाळबद्दल व्यक्त करतो असे मत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केले आहे. आज नेपाळमधील काटमांडू येथे १५ व्या बंगालच्या खाडी बहु-क्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार पुढाकार संघटना अर्थांत ‘बीआयएमएसटीईसी’च्या शिखर संमेलनात त्या बोलत होत्या. या शिखर संमेलनात सुषमा स्वराज भारताच्या प्रतिनिधी म्हणून गेल्या असल्याने आज त्यांनी त्यांचे विचार मांडले.

Embeded Object

येत्या १५ ऑगस्टला भारत देश ७० वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. जेव्हा भारतात इंग्रजांचे राज्य होते तेव्हा इंग्रज भारताच्या जनतेला अशिक्षित समजत होत. मात्र भारताने एकत्र येऊन स्वातंत्र्य संग्राम केला आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. ‘आम्ही भारताचे लोक’ या वाक्याच्या सुरुवातीने संविधानाची सुरुवात झाली असल्याने भारत देश सार्वभौम, धर्मनिरपेक्ष देश म्हणून ओळखला जातो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारताला एका राष्ट्राचा सन्मान दिला. त्यामुळे भारत देश एक परिपक्व लोकतंत्र म्हणून उदयास आला आहे. मागीलवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा नेपाळ भेटीवर आले होते. तेव्हा त्यांनी ‘नेपाळ हे राष्ट्र युद्धापासून बुद्धाकडे तर शस्त्राकडून  शास्त्राकडे वळत चालले आहे’ असे मत व्यक्त केले होते. त्यात सुषमा स्वराज यांनी त्यांचे शब्द टाकत ‘नेपाळ आता अविश्वासापासून विश्वासाकडे देखील वळत चालला’ असल्याचे मत व्यक्त केले.

 

भारत आतापर्यंत बऱ्याच आपत्तींना समोरा गेला आहे. मात्र तरी देखील भारत डगमगला नाही. नरेंद्र  मोदी यांनी केवळ भारत देशासाठी ‘सबका साथ सबका विकास’ हा नारा दिला नसून संपूर्ण जगासाठी हा नारा दिला असल्याचे मत स्वराज यांनी यावेळी मांडले. भारताच्या शेजारील राष्ट्रांचा देखील विकास व्हावा असा भारताचा मानस आहे. त्यामुळे नेपाळची प्रगती, उन्नती आणि समृद्धी व्हावी अशी आमची कामना असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.