'नायडूंची या पदावर निवड ही नवीन बदलांची नांदी'- पंतप्रधान नरेंद्र मोदी
 महा त भा  11-Aug-2017नवी दिल्ली : 'व्यंकय्या नायडू हे अनेक वर्षांपासून समाज जीवनाशी एकरूप झालेले आहेत. संघटनांचे सदस्य, समिती, लोकसभा, राज्यसभा या सर्व गोष्टींचा त्यांनी अगदी जवळून अभ्यास केला आहे. त्यामुळे नायडू यांची या पदावर निवड होणे ही नवीन आणि मोठ्या बदलांची नांदी आहे', असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केले. देशाचे १३ वे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या उपस्थितीत आज घेण्यात आलेल्या राज्यसभेचे पहिल्या सत्रात ते बोलत होते.


'नायडूंचा जन्म हा स्वातंत्र्यानंर झाला असल्यामुळे स्वतंत्र भारतात जन्मलेले ते देशाचे पहिलेच उपराष्ट्रपती आहेत. त्यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाल्यामुळे गाव, शेतकरी, दलित हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. नायडू यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यामुळे आज देशातील सर्व उच्च पदांवर गरीब कुटुंबातील व्यक्ती विराजमान झाले आहेत. ही देशाच्या लोकशाहीसाठी अत्यंत गर्वाची बाब असल्याचे मोदींनी म्हटले.


नायडू हे जयप्रकाश नारायण यांच्या जनआंदोलनातून जन्माला आलेले नेते आहेत. त्यामुळे देशाच्या विकासामध्ये त्यांनी आजपर्यंत खूप मोठे योगदान दिले आहे. संपूर्ण देशाला जोडणाऱ्या ग्रामसडक योजनेचे जनक देखील नायडू हेच आहेत. त्यामुळे एक परिपक्व असा नेता देशाच्या उपराष्ट्रपती विराजमान झाला होणे हे सर्वांचेच भाग्य मानले पाहिजे' असेही ते म्हणाले.

Embeded Object


विरोधी पक्षांकडून गुलाब नबी आझाद यांनी नायडू यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर भाषण केले. राज्यसभेच्या सभापतींचे पद हे एक न्याय तराजू आहे, याठिकाणी बसलेले व्यक्ती कोणताही पक्षपात न करता. सर्वांशी समान वर्तन करतात. त्यामुळे नायडू यांची या पदावर झालेले निवडही अत्यंत योग्य आहे.' असे आझाद म्हणाले.