पर्यावरण-स्नेही जैव इंधनावर केंद्र सरकारचा भर
 महा त भा  10-Aug-2017

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाकडून जागतिक जैव-इंधन दिन २०१७ साजरानवी दिल्ली:

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आज जागतिक जैव-इंधन दिन साजरा करत आहे. जैव इंधनाच्या लाभाबाबत शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतकरी आणि अन्य संबंधितांना जागरुक करणे आणि सरकारी कार्यक्रमात सहभागी करुन घेणे हा “जागतिक जैव इंधन” दिनाचा उद्देश आहे असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे. लोक मोहीम स्वरुपात हे प्रयत्न हाती घ्यायला हवेत असे ते म्हणाले.

Embeded Object

जैव इंधन कार्यक्रमाबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरातील १०० जिल्ह्यांमध्ये जागतिक जैव इंधन दिन साजरा केला जाणार असल्याचे प्रधान म्हणाले. ११ ते १४ ऑगस्ट २०१७ दरम्यान या जनजागृती मोहिमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहतूक आणि घरगुती वापरासाठी लागणाऱ्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी ८० टक्के कच्च्या तेलाची आयात करावी लागते. २०२२ पर्यंत यात १० टक्के घट करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधानांनी दिल्याचे प्रधान म्हणाले. जैव इंधनाला प्रोत्साहन दिल्यामुळे रोजगार निर्मितीत वाढ, आर्थिक विकासाला चालना, शेतकऱ्यांना मदत मिळेल आणि देशाची ऊर्जा सुरक्षा सुधारण्यात मदत होईल, असे ते म्हणाले.

पेट्रोलियम मंत्रालय लवकरच जैव इंधन धोरण आणेल असे प्रधान म्हणाले. रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि नौवहन मंत्री नितीन गडकरी यांनी कमी खर्चिक आणि पर्यावरण स्नेही जैव इंधनाचे महत्व अधोरेखित केले. जैव इंधनामुळे प्रदूषणात घट होईल तसेच टाकाऊ घटकांपासून देशात बनवण्यात येणाऱ्या जैव इंधनामुळे देशाचा आयातीवरचा बोजा कमी होईल असे ते म्हणाले. जैव इंधनावरील वस्तू आणि सेवा कर १८ टक्क्यांवरुन ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याची विनंती अर्थमंत्र्यांना करु असे गडकरी यांनी जाहीर केले.