नागराजच्या पहिल्या हिंदी सिनेमात अमिताभ खलनायक?
 महा त भा  10-Aug-2017

 

मराठी सिनेमातील मरगळ झटकणारा, प्रेमकथांना जातीय वास्तवाची असलेली किनार ठामपणे मांडणारा दिग्दर्शक नागराज मंजुळे नेहमीच आगळीवेगळ्या प्रयोगांमुळे चर्चेत असतो. अतिसामान्य कुटुंबातून आलेला नागराज मंजुळे आता हिंदी सिनेमा क्षेत्रात प्रवेश करत आहे. तेसुद्धा अतिशय दणक्यात! कारण पहिल्यावहिल्या हिंदी सिनेमात अभिनेता म्हणून महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करायला मिळणार असल्याने नागराज खुशीत आहे.

Embeded Object

याबद्दल नागराजने फेसबुकवर खास हिंदीत पोस्ट लिहून आपल्या हिंदी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पणाची वार्ता चाहत्यांना दिली आहे. या पोस्टमध्ये नागराज म्हणतो, “बचपन से जो मेरे सबसे पसंदीदा अभिनेता है, जिनकी फिल्में देखकर मैं बड़ा हुआ वही सदी के महानायक आज मेरी अगली हिंदी फ़िल्म के नायक है, इस से बड़ी और ख़ुशी की बात क्या हो सकती है...!”

                           

प्रत्यक्षात सिनेमा कोणत्या विषयावर असणार हे इतक्यात सांगितलेले नाही. पण याचमुळे उत्सुकता मात्र ताणली गेली आहे. अमिताभ बच्चन नागराजच्या पहिल्या हिंदी सिनेमात खलनायकाच्या भूमिकत दिसणार आहे असे फिल्मफेअर या प्रसिद्ध नियतकालिकाने म्हटले आहे.

 

नागराजचा पहिला सिनेमा सैराट आवडल्याचे ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केले होते. यामुळे एकमेकांच्या कामाबाबत पसंती देऊन एका वेगळ्या प्रवासाला झालेली सुरुवात खरंच कशी असणार असेल हे मात्र येणारा काळच ठरवेल..