परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर
 महा त भा  10-Aug-2017


काठमांडू (नेपाळ) : भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या आजपासून आपल्या दोन दिवसीय नेपाळ दौऱ्यावर गेल्या आहेत. याठिकाणी होणाऱ्या १५ व्या बिमस्टेक संघटनेच्या बैठकीत त्या सहभागी होणार असून चीन आणि भारत यांच्यात डोकलाम येथील सीमेवरून सुरु असलेल्या तणावावर देखील त्या बोलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


बिमस्टेक संघटनेच्या १५ व्या प्रतिनिधी बैठकीला आजपासून काठमांडूमध्ये सुरुवात होत आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीला नेपाळ आणि भारतासह भूतान, बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड या देशांचे सर्व प्रतिनिधी हजर राहणार आहेत. यामध्ये बिमस्टेक देशांसमोर असणारे आव्हाने व त्यावरील उपायांवर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच बिमस्टेक देशांमधील व्यापाराला आणि परराष्ट्र संबंध सुधारण्याविषयी देखील चर्चा होणार आहे.

Embeded Object


गेल्या दोन महिन्यापासून भारत आणि चीन यांच्यात भूतानच्या हद्दीतील डोकलाम येथील भागावरून वाद सुरु आहे. त्यामुळे परराष्ट्र मंत्री स्वराज या विषयवार देखील भूतान आणि इतर देशांची चर्चा करण्याची शक्यता आहे. त्यातच काल रात्री भूतानच्या परराष्ट्र मंत्रालयाने डोकलामविषयी असलेली आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चीनची डोकलाममधील घुसखोरीही भूतान-चीन यांच्ययातील १९८८ मध्ये झालेल्या कराराचे थेट उल्लंघन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे डोकलामप्रश्न इतर सदस्य राष्ट्र देखील भारत आणि भूतानला पाठींबा देण्याची शक्यता आहे.