राज्यसभेत बँकिंग नियमन विधेयक-२०१७ पारित
 महा त भा  10-Aug-2017

 

नवी दिल्ली : अनुत्पादक मालमत्तांवरून आज राज्यसभेत चर्चा झाली. आज राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बँकिंग नियमन विधेयक-२०१७ या विषयी राज्यसभेत चर्चा केली. चर्चेअंती आवाजी बहुमताने बँकिंग नियमन विधेयक-२०१७ राज्यसभेत मंजुर करण्यात आले.

Embeded Object

 

लोकसभेत ४ ऑगस्ट २०१७ रोजी बँकिंग नियमन विधेयक-२०१७ पारित झाले होते. बँकिंग नियमन कायदा १९४९ विरोधात आज पारित झालेल्या विधेयकाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला मोठ्या रकमेची कर्ज बुडवणाऱ्यांविरोधात सक्षम पावले उचलण्याचा अधिकार मिळणार आहे.

 

 

आज पारित झालेल्या विधेयकाने लाखो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात लपलेल्या व्यावसायिकांवर आणि इतर कर्जबुडव्यांवर आरबीआय सक्त वसुलीसाठी पर्याय शोधू शकेल. या कायद्याच्या आधाराने स्टेट बँक ऑफ इंडिया व एसबीआयच्या सहाय्यक बँक आणि ग्रामीण बँकांकडून घेतलेल्या कर्ज प्रकरणांवरही कारवाई करण्याची तरतूद करण्यात आली आहे.