नरेंद्र मोदी यांच्याकडून हमीद अन्सारी यांचे भरभरून कौतुक
 महा त भा  10-Aug-2017

 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी याचे भरभरून कौतुक केले आहे. आज पासून देशाचे नवे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू हे पदभार ग्रहण करणार असल्याने काल हमीद अन्सारी यांचा निरोप समारंभ संसद भवनातील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. हमीद अन्सारी यांच्या कार्यकाळात ते कोणत्याही वादात अडकले नाही आणि त्यांची प्रतिमा त्यांनी स्वच्छ नेता म्हणून जपली अशा शब्दांमध्ये नरेंद्र मोदी यांनी हमीद अन्सारी यांची स्तुती केली.

 Embeded Object

१९८४ नंतर एकाही उपराष्ट्रपतीचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला नव्हता, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली. अन्सारी यांना राजकारण हे वंश परंपरेनुसार मिळाले आहे. त्यांचे पूर्वज १९४८ भारत-पाकिस्तान युद्धात शहीद झाले असून त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळात बरेच चढउतार पहिले असल्याचे मत नरेंद्र मोदी यांनी मांडले आहे. त्यांच्या कार्यकाळात संसदेमध्ये खूप बदल झाले मात्र ते सगळे बदल त्यांनी सकारात्मक घेतले असून ते त्या बदलांना योग्य रीतीने सामोरे गेले असेही ते यावेळी म्हणाले.

 

अन्सारी यांनी त्यांच्या कार्यकाळात बरेच चांगले काम केले. पुढच्या पिढीला या सगळ्या बाबींचा फायदा होण्यासाठी एक दस्तावेज तयार करण्याचा सल्ला नरेंद्र मोदी यांनी हमीद अन्सारी यांना दिला. विकास कार्यासाठी त्यांच्या विचारांचे नेहमीच स्वागत केले जाईल. त्यांचा कार्यकाल संपला असला तरी देखील त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी अनमोल असेल असे नरेंद्र मोदी यांनी यावेळी हमीद अन्सारी यांना सुचवले. ११ ऑगस्ट २००७ ते १० ऑगस्ट २०१२ दरम्यान देशाचे १३ वे उपराष्ट्रपती तर ११ ऑगस्ट २०१२ ते १० ऑगस्ट १०१७ दरम्यान हमीद अन्सारी यांनी १४ व्या उपराष्ट्रपती पदाचा कार्यकाल सांभाळला आहे.