मोसुलवर इराकचा विजय, इराक पंतप्रधानांची घोषणा
 महा त भा  09-Jul-2017


इराकी सैन्य आणि इसीस यांच्यात सुरु असलेला युद्धात इराकने इसीसला आपल्या हद्दीतून पूर्णपणे नष्ट केल्याचे जाहीर केले आहे. इराकचे पंतप्रधान हैदर अल-अबादी यांनी मोसलवर पुन्हा एकदा इराकने विजय मिळवल्याचे जाहीर केले आहे. पंतप्रधान अल-अबादी यांनी स्वतः मोसलमध्ये जाऊन सैनिकांना या विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


पंतप्रधान कार्यालयाकडून या विषयी अधिकृत माहिती दिली आहे. इराकी सैनेनी मोसलवर असलेले इसीसचे वर्चस्व पूर्णपणे नष्ट केले असून मोसल पुन्हा एकदा इराकच्या अधिपत्याखाली आली आहे. या विजयानंतर पंतप्रधान अल-अबादी हे स्वतः मोसलमध्ये पोहचले. मोसलमध्ये जाऊन या मोहिमेत सामील झालेल्या सर्व सेनाधिकारी आणि सैनिकांना या विजयासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करत, युद्धाचा आढावा घेतला.

Embeded Object

Embeded Object


गेल्या तीन वर्षांपूर्वी मोसलवर इसीसने कब्जा केला होता. या विजयानंतर इराकमध्ये इसीसच्या हिंसक कारवायांना ऊत आला होता. त्यानंतर गेल्या तीन महिन्यांपासून मोसलसाठी इराकी सैन्य आणि इसीस यांच्यात युद्ध सुरु होते. यामध्ये दोन्ही पक्षांचा मोठ्या प्रमाणत रक्तपात झाला होता. त्यामुळे इसीसवर मिळालेल्या या विजयामुळे संपूर्ण इराकमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.