जी-२० शिखर संमेलनात पॅरिस कराराला सगळ्यांचे समर्थन, अमेरिकेची पंचाईत
 महा त भा  09-Jul-2017जी-२० शिखर परिषदेत हवामान बदल या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी इतर सर्व १९ देशांनी पॅरिस कराराला समर्थन दर्शविले आहे. मात्र अमेरका अद्यापही या कराराला समर्थन दर्शविण्यास तयार नाही, असे दिसून येत आहे. यामुळे जी-२० देशांमध्ये हवामान बदल या विषयावर इतर १९ देश एकाबाजूला आणि अमेरिका एकटे एका बाजूला असे चित्र उभे राहीले आहे.

इतर देशांनी मात्र अमेरिकेच्या निर्णयाला स्वीकारले आहे. तसेच या कराराला बदलता येणार नाही. असे देखील या सर्व देशांतर्फे सांगण्यात आले आहे. तसेच अमेरिका इतर देशांना स्वच्छ ईंधन वापरण्यात मदत करेल असे आश्वासन अमेरिकेतर्फे देण्यात आले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी, 'पॅरिस करारात अमेरिकेच्या नागरिकांकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.' असा आरोप केला आहे. तसेच अमेरिकेमध्ये कोळसा उद्योग पुनर्जीवित करण्यासाठी ते प्रयत्न करतील असे देखील त्यांनी म्हटले आहे.

यावेळी हॅमबर्ग येथे अनेक नागरिकांनी यावेळी प्रदर्शने देखील केली. हवामान बदल आणि उत्पन्नात एक समानता नसणे या मुदद्यांवर प्रदर्शने करण्यात आली. ट्रंप आणि पुतीन यांच्या विरोधात ही प्रदर्शने असल्याचे सांगण्यात येत आहे.