‘धोनीने खऱ्या धोनीला अशा अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा’
 महा त भा  07-Jul-2017

 

एम.एस. धोनी या चित्रपटातून प्रसिद्ध झालेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने खऱ्या आयुष्यात असलेला क्रिकेटचा स्टार एम.एस. धोनी याला त्याच्या वेगळ्या अंदाजमध्ये वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सुशांत सिंह राजपूत याने त्याच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून शेअर केलेल्या व्हिडीओतून धोनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Embeded Object

एम.एस. धोनी या चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त बीट घेत सुशांतने एका कार्यक्रमात धम्माल केली आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा कॅप्टन, ‘फेमिना मिस इंडिया’मधील हा नृत्याविष्कार खास तुमच्यासाठी, ‘तुमच्यासारखे कोणीच नाही महेंद्र जी’..असे आदर देणारे ट्वीट सुशांतने या व्हिडीओसोबत केले आहे.

 

७ जुलै आजच्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीचा जन्म झाला होता. त्याच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे तो रातोरात क्रिकेटचा स्टार म्हणून ओळखू जावू लागला. त्यानंतर त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटामुळे तर तो भारतात प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईतच बनून गेला.