‘मुबारका’ चित्रपटाचे नवे गाणे प्रदर्शित
 महा त भा  06-Jul-2017

 

‘मुबारका’ चित्रपटाचे नवे गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘द गॉगल साँग’ असे या गाण्याचे नाव आहे. पंजाबी तडका असलेले हे गाणे सध्या सगळ्यांच्या ओठांवर असलेले दिसत आहे. अभिनेता अनिल कपूर, अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेत्री इलियाना डी क्रूज़ आणि  अभिनेत्री आथिया शेट्टी या गाण्यात पंजाबी नृत्य करतांना दाखवले गेले आहेत.

Embeded Object

प्रसिद्ध गायक सोनू निगम आणि गायिका नीती मोहन यांनी मिळून हे गाणे म्हटले आहे. या गाण्यात वरील सगळी मांडली बिनधास्त नृत्य करतांना आपल्याला दिसत असल्याने चित्रपटात हे गाणे काहीतरी वेगळे वळण लावणारे आहे असे दिसून येत आहे. याआधी काला चष्मा हे गाणे बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध झाले होते आता हे नवे ‘द गॉगल साँग’ किती प्रमाणात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

‘मुबारका’ हा चित्रपट २८ जुलै २०१७ ला चित्रपट गृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोरंजन आणि कॉमेडी असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर किती दमदार कामगिरी करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.