‘बीच बीच मैं’ या गाण्यावर शाहरुख आणि अनुष्काने घेतला ठुमका
 महा त भा  04-Jul-2017

 

बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्माचा आगामी चित्रपट ‘जब हैरी मेट सेजल’ या चित्रपटातील अजून एक नवे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. हे नवे गाणे शाहरुखने त्याच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवले आहे. ‘बीच बीच मैं’ असे या गाण्याचे बोल असून या गाण्यात शाहरुख आणि अनुष्का एकदम बिनधास्त लुकमध्ये दिसत आहेत.

Embeded Object

या आधी या चित्रपटातील ‘राधा’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते मात्र या नव्या गाण्यात हे दोघेही अतिशय आनंदी आणि बिनधास्त लुकमध्ये आपल्याला दिसत आहेत. या गाण्यात देखील सेजल तिची ‘अंगठी’ शोधण्यात व्यस्त दिसत आहे, त्यामुळे या अंगठीची गोष्ट काय आहे हे तर आपल्याला हा चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

 

या गाण्याचे गायक प्रसिद्ध गायक अरिजित सिंघ आणि गायिका शालमली खोलगड़े हे असून सध्या सोशल मीडियावर या गाण्याची धूम आपल्याला पाहायला मिळत आहे. अनुष्का आणि शाहरुख पुन्हा एकदा एकत्र दिसणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना देखील हा चित्रपट कधी प्रदर्शित होतो याची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट ४ ऑगस्ट २०१७ ला चित्रपटगृहात आपल्याला पाहायला मिळणार आहे.