चीनमध्ये ६० नद्यांना पूर
 महा त भा  03-Jul-2017चीनमध्ये ६० नद्यांना पूर आल्याने मोठ्या प्रमाणात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात अद्याप ८ नागरिक मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे. या पूरामुळे दक्षिण चीन हे क्षेत्र प्रभावित झाले आहे. अतिवृष्टी झाल्याने हा पूर आला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Embeded Objectचीनमध्ये या ६० छोट्या छोट्या नद्या अतिवृष्टीमुळे तुडुंब भरल्या आहेत. त्यामुळे पूर आला असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक नागरिक बेपत्ता झाले आहेत, तर अनेक बेघर झाले आहेत असे सांगण्यात येत आहे.

गेल्या १० दिवसांपासून चीनमध्ये अतिवृष्टी होत आहे. यामुळे भूस्खलन झाल्याची घटना देखील घडली आहे. या भूस्खलनात ५ नागरिक ठार झाले आहेत, तर १९ नागरिक जखमी झाले आहेत. दक्षिण चीनच्या काही भागांमध्ये गेल्या २४ तासांत २०० मि.मी. पाऊस पडला आहे. सगळ्यांच नद्यांमध्ये पाणी धोक्याच्या पातळीच्यावर वाहत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.