कोकणातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफायने जोडणार - अनंत गीते
 महा त भा  28-Jul-2017

 

अलिबाग : डिजिटल इंडिया या कार्यक्रमाअंतर्गत रायगड जिल्ह्यासोबत कोकणातील सर्व ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेमार्फत चालविल्या जाणाऱ्या शाळांना वायफाय सुविधेने जोडले जात असून हे काम प्रगतीपथावर आहे, अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी दिली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती म्हणजेच दिशा समितीची बैठक आज पार पडली त्यात ते बोलत होते.

Embeded Object

जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती व शाळांना वायफायने जोडण्यात येणार आहे. त्यासाठी केबल टाकण्याचे काम पूर्ण होत आले असून अनेक ग्रामपंचायतींपर्यंत वायफाय जोडणी मिळाली आहे. या कामाला अधिक गती देण्यासाठी येत्या ३ ऑगस्टला दिल्ली येथे बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती गीते यांनी यावेळी दिली.

रायगडमध्ये दोन जलमार्ग प्रस्तावित

सागर माला प्रकल्पाअंतर्गत रायगड जिल्ह्यातील धरमतल ते मुरुड व कुंडलिका ते रेवदंडा हे जलमार्ग प्रस्तावित आहेत. या कामांना लवकरच सुरुवात होण्याची माहिती या कार्यक्रमात देण्यात आली.

  • मनरेगाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शेतातील बांधबंदिस्ती, कंपोस्ट खताचे खड्डे आदी कामांचाही योजनेत समावेश करण्यात आला आहे.
  • ग्रामीण विद्युतीकरणाला गती देण्यासाठी दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजनेअंतर्गत १२९ कोटी रुपयांची कामे होत आहेत, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.