अभिनेता इंद्र कुमार यांचे निधन
 महा त भा  28-Jul-2017९० च्या दहशकातील सक्रीय अभिनेता इंद्र कुमार यांचे दीर्घ आजाराने काल मुंबई येथे निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. ४५ वर्षीय इंद्र कुमार यांनी सलमान खान, अक्षय कुमार या सारख्या अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केले आहे.

मुंबई येथील राहत्या घरी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांचा मृत्यु हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने झाला असल्याची देखील शक्यता वर्तविण्यात येत आहे. ते दीर्घ काळापासून आजारी होते.

इंद्र कुमार यांनी मासूम, खिलाडियों के खिलाडी, तिरछी टोपी वाले, आर्यन, पेईंग गेस्ट, वाँटेड अशा अनेक मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तसेच प्रसिद्ध मालिका "क्यूँ की साँस भी कभी बहू थी" मध्ये त्यांनी काही काळासाठी मिहीर विरानी ही भूमिका साकारली होती.