कम्युनिस्ट रशियात इंटरनेटवर बंदी
 महा त भा  25-Jul-2017


 

मॉस्को : रशियन सरकारने देशात व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क अर्थात व्हिपीएन आणि अन्य खासगी सर्व्हर्सवर व इंटरनेट पुरवठादारांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. रशियाच्या संसदेने आज या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. गेल्या आठवड्यात २१ जुलै रोजी रशियन संसदेच्या खालच्या सभागृहात हे विधेयक पारित झाले होते. आज वरच्या सभागृहातही हे विधेयक रशियन खासदारांनी पारित केले. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होण्यासाठी आता केवळ राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांची स्वाक्षरी होणे बाकी असून त्यानंतर हा कायदा अस्तित्वात येणार आहे. या कायद्यामुळे खासगी इंटरनेट पुरवठादारांवर बंदी घालण्यात आली असून केवळ सरकारी इंटरनेट पुरवठ्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांची गोपनीय माहिती रशियन सरकारला कळणार आहे.

दरम्यान या विधेयकाला रशियामधून तीव्र विरोध करण्यात येत आहे. कम्यनिस्ट विचारांच्या रशियामध्ये अशाप्रकारे नागरिकांच्या स्वातंत्र्यावर बंधने आणणे योग्य नाही असे सांगत २० हजारहून अधिक जणांच्या जमावाने काल मॉस्कोमध्ये आंदोलन केले. मात्र त्याकडे कोणतेही लक्ष न देता आज रशियाच्या संसदेमध्ये हे विधेयक पारित करण्यात आले.