शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : गुडबाय
 महा त भा  25-Jul-2017
 

 
म्हातारपणात जर आपल्यासोबत कोणी नसेल तर ते म्हातारपण कित्ती एकटे एकटे असेल नाही ? असे म्हणतात, तारुण्यात जरी नवरा बायकोची गरज, किंमत तितकीशी कळली नाही, तरी म्हातारपणी ती नक्की कळते. त्यामुळे नवरा बायको यांनी आधी 'बेस्ट फ्रेंड्स' असणे गरजेचे आहे, मग पती पत्नी. म्हातारपणात मैत्रीतील वेडेपणाच जगण्याची उमेद देतो.. हे सगळं मी म्हणत नाहीये... हा लघुपट सांगतोय..

नावाप्रमाणे या लघुपटात 'गुडबाय' आहेच.. मात्र या लघुपटाची सुरुवात झाल्यानंतर त्याची कहाणी असे काहीसे वळण घेईल हे वाटत नाही. एका मुलीच्या दाखवण्याचा कार्यक्रम सुरु असतो, त्यात तिची होणारी सासू (?) तिला गाणं म्हणून दाखवायला सांगते.. आणि त्यानंतर स्क्रीन वर दिसते एक म्हातारी आज्जी.... गाणं म्हणताना, त्या मुलीचा आणि या म्हाताऱ्या आज्जींचा काय संबंध ? तसेच आज्जी आजोबांमधील नातं, त्यांची गमतीशीर भांडणं, याचा त्या मुलीच्या दाखवण्याच्या कार्यक्रमाशी काय संबंध ? ती मुलगी नेमकं कुठलं गाणं म्हणते ? हे सगळं जाणून घेण्यासाठी नक्की बघा हा लघुपट...
 
 
 
प्रसिद्ध नायिका सुहासिनी मुळे आणि नट परीक्षित साहनी यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या लघुपटाला यूट्यूबवर १,६८,२६२ व्ह्यूज मिळाले आहेत. तर मग तुम्ही कधी बघताय हा लघुपट ?...
 
- निहारिका पोळ