गूगलचे प्रमुख सुंदर पिचाई आता 'अल्फाबेट'च्या संचालक मंडळात
 महा त भा  25-Jul-2017


 

गूगल या माहिती तंत्रज्ञान जगतातील विख्यात कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई आता गूगलच्या पालक कंपनी अल्फाबेटचे संचालक मंडळाचे सदस्य म्हणून नियुक्त झाले आहेत.

सुंदर पिचाई यांनी गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून उत्तम कामगिरी बजावली आहे, म्हणूनच त्यांची अल्फाबेटच्या संचालक मंडळात वर्णी लागत आहे, अशी प्रतिक्रिया अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी लॅरी पेज यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की, गूगलची झालेली प्रगती, विविध गूगल उत्पादनाच्या वापरत झालेली वाढ, विविध भागीदारी यासर्व आघाड्यांवर पिचाई यांनी शानदार काम केल्यामुळे आता अल्फाबेटमध्ये त्यांच्यासोबत काम करायला मी उत्सुक आहे.

२०१५ साली सुंदर पिचाई हे गूगलचे मुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झाले. त्यात त्यांनी अँड्रॉइड, गूगल क्लाउड, त्यांसंदर्भात महत्वाची कामगिरी बजावली, त्याचबरोबर गूगल मॅप देखील मोठ्याप्रमाणात याकाळात प्रसिद्ध झाले. २०१५ लॅरी पेज यांनी अल्फाबेट गूगलची पालक कंपनी असणार असे घोषित केले होते. तेव्हापासून अल्फाबेट आणि गूगल वेगवेगळी झाली. आता या अल्फाबेटमध्ये देखील पिचाई यांना स्थान मिळाल्यामुळे माहिती तंत्रज्ञानाच्या जगात त्यांचे स्थान महत्वाचे ठरणार आहे.

याची फोर्ब्स सारख्या जगविख्यात मॅगझीन सहित अनेक महत्वाच्या लोकांनी याची नोंद घेतली आहे.

Embeded Object

Embeded Object