हिशेबाच्या पलिकडे असतात ‘आई-बाबा’...!
 महा त भा  24-Jul-2017


‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाची पोस्टरपासूनच रसिकांना उत्सुकता लागून राहीली आहे. अशातच टिझर व ट्रेलरनंतर आता या चित्रपटातील पहिलं गाणं आज प्रदर्शित झालयं. ‘माझे आई बाबा’ असं या गाण्याचं नाव आहे. ‘माझे आई बाबा, स्पेशल आई बाबा; देवाजीचे दोन हात माझे आई बाबा’ असे या गाण्याचे बोल आहेत. संगीत, गाण्याचे बोल, आवात आणि चित्रिकरण या सगळ्याच बाबतीत हे गाणं प्रचंड ‘इमोशनल’ बनलं आहे.

Embeded Object

संदीप खरे याने उत्तम शब्दात हे गाणं लिहीलं असून तितक्याच हळूवार व भावनिक पद्धतीने अवधून गुप्तेने त्याला आवाज दिला आहे. अभिनेता प्रसाद ओकचा हा पहिलाच दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे. यामध्ये सचिन खेडेकर, सोनाली कुलकर्णी, रवी जाधव व मनमित पेम हे मुख्य भूमिकेत दिसत आहेत.

हा चित्रपट ‘ब्लॅक अँड व्हाईट’ स्वरूपात असल्याने व ‘स्पेशल चाईल्ड’सारखा गंभीर विषय या चित्रपटात दाखविलेल्याने आत्तापासूनच त्याबद्दल उत्सुकता लागून राहीली आहे. चिन्मय मांडलेकर याने या चित्रपटाची कथा लिहीली आहे. येत्या 11 ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. तोपर्यंत तुम्ही चित्रपटाचा हा ट्रेलर बघून घ्या...

Embeded Object