आर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख उडुपी रामचंद्र राव यांचे निधन
 महा त भा  24-Jul-2017


बंगळूरू : भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी संचालक आणि आर्यभट्ट मोहिमेचे प्रमुख डॉ. उडुपी रामचंद्र राव यांचे आज पहाटे बंगळूरू येथे निधन झाले आहे. ते ८५ वर्षांचे होते. गेल्या दिवसांपासून राव हे श्वसन विकारांनी ग्रस्त होते. बंगळूरूतील त्यांच्या निवासस्थानी आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास सोडला.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील राव यांच्या जाण्यावर दु:ख व्यक्त केले आहे. राव यांच्या जाण्याने अत्यंत दु:ख झाले असून राव यांनी भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात दिलेली अमुल्य योगदान देश कधीही विसरणार नाही. अशा मोदी यांनी राव यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

Embeded Object


राव यांचा जन्म १० मार्च १९३२ मध्ये कर्नाटकातील उडुपी येथील अदामारू गावात झाला होता. यानंतर मद्रास विद्यापीठातून त्यांनी आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. तर गुजरात विद्यापीठातून आपली पी.एचडीची पदवी मिळवली होती. सन १९८४ ते १९९४ या दहा वर्षाच्या काळात ते इस्रोचे प्रमुख म्हणू कार्य पाहत होते.


आर्यभट्ट हा भारताच्या पहिला उपग्रह राव यांच्या कार्यकाळातच अवकाशात पाठवण्यात आला होता. आर्यभट्ट मोहीम यशस्वी होण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार होता. त्यामुळे भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात राव यांना अनन्य साधारण महत्त्व दिले जाते.अवकाश संशोधन क्षेत्रातील त्यांच्या भरीव कामगिरीमुळे त्यांना पद्मभूषण पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.