वृद्धांसाठी 'वय वंदना योजने'चा आज शुभारंभ

    21-Jul-2017
Total Views |


या योजनेअंतर्गत ८ टक्के व्याज मिळणार 


दिल्ली : वृद्धांसाठी आज नवी दिल्ली येथे 'वय वंदना योजने'चा औपचारिकरीत्या शुभारंभ करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ होणार असून भारत सरकारकडून या योजनेची घोषणा कऱण्यात आली आहे. पंतप्रधान वय वंदना योजना ही एक पेन्शन योजना असून ६० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.


ही योजना ४ मे २०१७ ते ३ मे २०१८ पर्यंत उपलब्ध असणार आहे. या योजनेला भारतीय जीवन वीमा अर्थात एलआयसी ऑफलाईन बरोबरच ऑनलाईनेही खरेदी करता येणार आहे. ही योजना १० वर्षाला ८ टक्के मासिक देय सुनिश्चित करते. तसेच या योजनेला सेवा कर आणि जीएसटीमधून सूट देण्यात आली आहे. या योजनेत ६०००० गुंतवल्यास दरमहा ५ हजार रूपये मिळणार आहेत.

१० वर्षाच्या या योजनेत संबंधित व्यक्ती जिवंत असल्यास त्याला पेन्शनच्या रकमेसोबतच अंतिम पेन्शन हप्ताही मिळेल. मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्च्यात पेन्शन ची किंमत लाभार्थ्याला मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मासिक, तिमाही आणि सहामाही कालावधीत पेन्शन मिळू शकणार आहे. याशिवाय पेन्शनरला किंवा त्याच्या पत्नीला गंभीर आजार झाल्यास तो या योजनेतून बाहेर पडू शकतो. यावेळी ही योजना खरेदी करतानाच्या किमतीच्या ९८ टक्के रक्क्म परत मिळणार आहे.