केंद्राकडून ‘एरोस्पेस विद्यापीठा’च्या प्रस्तावाला मंजुरी
 महा त भा  21-Jul-2017

 

दिल्ली: भारतात एरोस्पेस (अंतराळ) विद्यापीठ निर्माण करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली आहे. आज केंद्र सरकारकडून एरोस्पेस विद्यापीठ  प्रस्ताव स्वीकार करण्यात आला आहे. त्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आता अंतराळाचे शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज भासणार नाही.

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थांत ‘इस्रो’ ही भारताची अंतराळ संशोधन करणारी महत्वाची संस्था आहे. त्यामुळे देशात अंतराळ संशोधन संस्था असली तरी देखील देशात एकही अंतराळ विद्यापीठ नसल्याने आता केंद्र सरकारने या प्रस्तावाला स्वीकृती दिली आहे.

 

यामुळे परदेशातील विद्यार्थी देखील भारतात अंतराळाचे शिक्षण घेण्यास येऊ शकतील. भारतात अंतराळ विद्यापीठ निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार लवकरच घोषणा करेल अशी माहिती सध्या मिळत आहे.