बघा कोण साकारतयं तानाजी मालुसरेंची भूमिका
 महा त भा  20-Jul-2017
इतिहास म्हटले की डोळ्यासमोर सगळ्यात पहीले येतात ते म्हणजे महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराज म्हटले की डोळ्यासमोर येते "गढ आला पण सिंह गेला.." तो सिंह म्हणजेच तानाजी मालुसरे. बॉलिवुड मध्ये आज पर्यंत अनेक इतिहासावर आधारित चित्रपट काढण्यात आले आहेत. मग ते जोधा अकबर असू देत नाहीतर बाजीराव मस्तानी. मात्र आता पहिल्यांदाच सिने सृष्टीच मराठमोळ्या तानाजी मालुसरेंचा इतिहास दाखविण्यात येणार आहे. आणि ही महत्वाची भूमिका साकारणार आहे अनेकांचा लाडका अभिनेता अजय देवगण.

Embeded Objectफेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमतून ही बातमी सांगत अजय म्हणतो की, " ते त्यांच्या माणसांसाठी, त्यांच्या मातीसाठी आणि त्यांच्या राजा छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अखेरपर्यंत लढले. ते म्हणजेच गौरवशाली भारतीय इतिहासातील अजेय योद्धा नरवीर तानाजी मालुसरे.."

'तानाजी... द अनसंग वॉरिअर' या चित्रपटाचं पोस्टर अभिनेता अजय देवगणनं आज ट्विटर आणि फेसबुक वरून आपल्या चाहत्यांसाठी पोस्ट केलं आहे. या चित्रपटात तो तानाजींची भूमिका साकारणार आहे, तर लोकमान्य चित्रपट फेम ओम राऊत या चित्रपटाचे दिग्दर्शक असणार आहेत.


Embeded Object


त्यानी हे पोस्टर शेअर केल्याच्या काही क्षणातच त्याला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. यावर चाहत्यांच्या अनेक कमेंट्सही आल्या आहेत, कुणी "पोस्टर पाहून खूप आनंद झाला मूव्ही तर सूपर हिट असणार," असे मत व्यक्त केले आहे तर कुणी अगदीच "हळू हळू सिनेसृष्टी आता इस्लामिक संस्कृती पासून लांब जात असल्याचा आनंद होत आहे." असे देखील म्हटले आहे. 


मराठमोळ्या इतिहासाकडे आता सिनेसृष्टी वळते आहे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाचीच बाब आहे. पुढील काही दिवसात रवि जाधव दिग्दर्शित आणि रितेश देशमुख अभिनित "छत्रपती" हा चित्रपट देखील येत आहे. हा चित्रपट छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे.
एकूणच महाराष्ट्रच्या लोकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास हा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यातून इतक्या मोठ्या प्रमाणावर हा इतिहास दाखविण्यात येणार म्हणजेच अत्यंत आनंदाची बाब आहे, मात्र इतिहासाबद्दल सिनेमा म्हटला की त्यासंबंधी वाद विवाद हे उद्भवणारच असे काहीसे म्हटले जाते, त्यामुळे या सिनेमासोबत देखील असेच होणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तानाजी मालुसरेंचा इतिहास जागतिक पातळीवर आणणे खरच मोठी बाब आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये याविषयी मोठी उत्सुकता आहे.