‘हे’ रोमँटिक गाणं ऐकल्यावर तुम्हीही हरवून जाल...
 महा त भा  19-Jul-2017

सध्या सोशल मीडिया दोन चित्रपटांची चर्चा चांगलीच रंगती आहे. हे दोन्ही चित्रपट ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होत आहे. यातील एका चित्रपटाचे नाव आहे भिकारी. नावातून आपले वेगळेपण जपणार्‍या या चित्रपटाने सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांत धूम माजवली आहे. अशातच या चित्रपटातील तिसर गाणं आज प्रदर्शित झाले आहे. ‘ये आता, तु मिठीत या हरवून जा जरा’ असे या गाण्याचे बोल आहेत. मराठीतील हे ताज्या दमाचे रोमँटिक गाणे ऐकल्यावर तुम्हीही हरवून जाल, हे मात्र नक्की.

Embeded Object

स्वप्नील जोशी व रूचा इनामदार यांच्यावर हे गाणं चित्रित करण्यात आलं आहे. सुनिधी चौहान व विशाल मिश्रा या दोघांनी या गाण्याला सुमधूर आवाज दिल्याने ते अत्यंत श्रवणीय झाले आहे. हे गाणं देखील विशालनेच लिहिले आहे. गाण्याचे बोल एकदम मस्त असून या गाण्याचे संपूर्ण चित्रिकरण हे परदेशात झाले असल्याचे दिसून येते. या गाण्यातील डान्स, लोकेशन्स व ड्रेसिंग सेन्स पाहता हे गाणं हिंदीच्या तोडीस तोड झाले आहे, असेच म्हणावे लागेल.

Embeded Object

येत्या ४ ऑगस्ट रोजी भिकारी चित्रपट प्रदर्शित होत आहे. या अगोदर चित्रपटातील ‘देवा हो देवा’ व ‘मागू कसे मी’ ही दोन गाणी व ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. या सगळ्यालाच रसिकांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. आता ते वाट बघत आहेत चित्रपट प्रदर्शित होण्याची. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रसिद्ध कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रथमच मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.

Embeded Object