भारतीय अंतराळ तंत्रज्ञानाचे सुवर्ण युग - डॉ. जितेंद्र सिंह
 महा त भा  19-Jul-2017


 

नवी दिल्ली: २०१७ या वर्षात, इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने १५ फेब्रुवारीला १०४ तर २३ जूनला ३१ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले होते, भारतीय अंतराळ संस्थेची ख्याती त्यामुळे जगभर प्रसिद्ध झालेली आहे,आणि भारतीय तंत्रज्ञानाला मागणी वाढली आहे, त्यामुळे या क्षेत्रात भारताचे सुवर्ण युग सुरु आहे. असे मत केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी, माहिती देताना ते बोलत होते. इस्रोचे दोन कार्टोसॅट उपग्रह, दोन भारतीय नॅनो उपग्रह, एका भारतीय विद्यापीठाचा नॅनो उपग्रह आणि १३० परकीय उपग्रह गेल्या वर्षभरात प्रक्षेपित झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या परकीय उपग्रहांमध्ये अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान, युएई, चिली अशा १९ देशांच्या उपग्रहांचा समावेश आहे.

६१ लाख युरोंची कमाई

इस्त्रोची व्यावसायिक शाखा एंट्रिक्स कॉर्पोरेशन लिमिटेडनं एकोणतीस नॅनो उपग्रहांच्या प्रक्षेपणातून सुमारे ६१ लाख युरो इतक्या परदेशी चलनाची कमाई केली असल्याची माहिती, देखील त्यांनी दिली.

जीसॅट-१७ चे प्रक्षेपण

जीसॅट-१७ या दळणवळण उपग्रहाचे २९ जून २०१७ एरियाना ५ प्रक्षेपकाद्वारे कौरु प्रक्षेपण तळावरुन यशस्वी प्रक्षेपण झाले. जीसॅट-१७ ची सध्या कक्षा चाचणी सुरु असून लवकरच तो इन्सॅट/जीसॅट यंत्रणेत समाविष्ट केला जाईल.

Embeded Object