दहशतवादी सलीम खानला मुंबई विमानतळावर अटक
 महा त भा  17-Jul-2017

महाराष्ट्र व उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाची संयुक्त कारवाईमुंबई: लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी सलीम खान याला मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश दहशतवाद विरोधी पथकाच्या(एटीएस) संयुक्त कारवाईत सलीमला अटक करण्यात यश प्राप्त झाले आहे.

सलीम खान हा उत्तरप्रदेश मधील फतेहपुर येथील रहिवासी आहे. अनेक काळापासून दहशतवादी संघटनांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. उत्तरप्रदेश पोलीस २००८ पासून त्याचा तपास करत होते. काही दिवसांपूर्वी आयएएसच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती.

सलीम खान याने पाकिस्तानातील मुजफ्फराबाद येथे दहशतवादी प्रशिक्षण घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर दहशतवाद पसरविण्यासाठी पैसा आणि प्रशिक्षण पुरवत असल्याचे देखील समोर आले आहे. अशा या दहशतवाद्याची अटक ही महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश पोलिसांसाठी मोठी कामगिरी मानली जात आहे.