८ वे विम्बल्डन जिंकल्यावर रॉजर फेडररला आले रडू
 महा त भा  17-Jul-2017

 

लंडन येथे काल झालेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेचा खिताब जगप्रसिद्ध टेनिसपटू रॉजर फेडरर याला मिळाल्यावर रॉजर चक्क मैदानावर आनंदाने रडू लागला. त्याच्या सहकाऱ्याशी हात मिळवणी केल्यावर रॉजर विश्रांतीसाठी बसल्यावर अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू येवू लागले.  

Embeded Object

८ वे विम्बल्डन ग्रँडस्लॅम जिंकल्याचा आनंद तर गगनात मावेनासा असतो. मात्र या ठिकाणी रॉजरने हा आनंद डोळ्यातून येणाऱ्या अश्रूंनी व्यक्त केला आहे. रॉजरने हे विम्बल्डन जिंकून एक इतिहास तयार केला आहे. त्यामुळे तो टेनिसचा स्टार म्हणूनच नेहमी ओळखला जाणार आहे.

फेडररने १९ वे ग्रॅण्ड स्लॅम या विजयासह त्याच्या नावावर केले आहे. ३५ वर्षीय रॉजररने ८ विम्बल्डन, १ फ्रेंच ओपन आणि ५ ऑस्ट्रेलिया ओपन अशा स्पर्धा त्याच्या नावावर करून घेतल्या आहे. त्यामुळे तो सध्या जगातून तिसऱ्या क्रमांकावर असणारा टेनिसपटू ठरला आहे.