इंग्लंड येथे हरे कृष्ण उत्सवाला जल्लोषात सुरुवात
 महा त भा  17-Jul-2017इंग्लंड येथे मोठ्या जल्लोषात हरे कृष्णा उत्सवला सुरुवात झाली आहे. इस्कॉन मंदिराच्या माध्यमातून हा उत्सव दर वर्षी आयोजित करण्यात येतो. नेहमीप्रमाणे यावर्षी देखील या उत्सवाला जगभरातून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. या उत्सवाचे प्रमुख आकर्षण "रथयात्रा" असते. यामध्ये आज इंग्लंड येथे ४० फुट मोठ्या रथाची यात्रा काढण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात कृष्ण भक्त सहभागी झाले आहेत.

Embeded Object
या रथयात्रेत भागवान जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा देवी यांची यात्रा काढण्यात येत आहे. यावेळी विविध वाद्यवृंदांच्या निनादात आणि आनंददायी नृत्य करत भक्त या रथयात्रेत सहभागी होतात.

रथयात्रेनंतर आयोजित कार्यक्रमात मंचावर गायन, नृत्य, एक संक्षिप्त नाट्यपूर्ण प्रदर्शन आणि एक जादूचे प्रदर्शन असे मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच यामध्ये योगादेखील करण्यात येणार आहे. लहान मुलांसाठीही येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चेहऱ्यावर चित्रकला, विविध टॅटू, पुस्तकांची दुकाने, कपडे आणि दागदागिन्यांची दुकाने, इत्यादी देखील असणार आहेत. अशी माहिती हरे रामा हरे कृष्णा उत्सवाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.