जीएसटीची आज दिल्लीत बैठक
 महा त भा  17-Jul-2017


जेटली व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून घेणार आढावा


नवी दिल्ली : वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी संपूर्ण देशात १ जुलै रोजी लागू झाले असून आज जीएसटीची नवी दिल्ली येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत नवीन कर प्रणाली लागू केल्यानंतर बदललेल्या परिस्थितीचे पुनरावलोकन करणार आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात जीएसच्या बैठकीची स्थापना केली गेली होती. त्यामुळे आता ही जीएसटीची १९ वी बैठक असणार आहे.


केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून जेटली पहिल्यांदाच व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणार आहेत अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

Embeded Object

 

जीएसटी बैठकीत चर्चा होणार विषय

जीएसटीवरून देशात अनेक तर्कवितर्क लढवले जात असताना आज जईसटीच्या बैठकीत जीएसटी लागू झाल्यानंतर दोन आठवड्यात त्याचा कोणत्या गोष्टीवर परिणाम झाला आहे यावर विस्तृत चर्चा होईल.

. १३ जुलै रोजी मुंबई शेअर बाजाराने पहिल्यांदाच ३२ हजारांचा टप्पा पार केला होता. जीएसटी नंतर शेअर बाजार मंदावेल असे वक्तव्य केले जात असतानाच शेअर बाजाराने गाठलेला हा आकडा अर्थव्यवस्थेसाठी नक्कीच फायद्याचा ठरू शकतो. त्यामुळे या बैठकीत शेअर बाजारावर चर्चा होऊ शकते. 

. याशिवाय जुने सोने असल्यास अथवा जुने सोने विकल्यास त्यावर ३ टक्के जीएसटी लागू होणार नाही. 

. जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक वस्तूंच्या किमतीत बदल झाले आहेत. काही मोठ मोठ्या कंपन्यांनी चार चाकी आणि दुचाकी वाहनांची किंमतही कमी केली आहे.  

. हॉस्टेलवर वर्षभर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना फीज म्हणून १८ टक्के जीएसटी कर लागू होणार नाही अशी घोषणा सरकारने केली होती. त्याचाही आढावा घेतली जाऊ शकतो.