फारूक अब्दुल्ला यांनी घेतली लोकसभा सदस्यपदाची शपथ
 महा त भा  17-Jul-2017


 

नॅशनल कॉन्फरंसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी लोकसभा सदस्यपदाची शपथ आज घेतली आहे. काश्मीर येथील श्रीनगर-बडगाम या मतदार संघातून पोटनिवडणुकीत त्यांनी निवड झालेली आहे.

लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी त्यांना शपथ विधी साठी निमंत्रित केले, त्यानंतर लोकसभा अध्यक्षांच्या उपस्थितीत हा शपथविधी पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इतर नेत्यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या.

श्रीनगर-बडगाम या मतदार संघात ते पोटनिवडणुकीत निवडून आले आहेत. त्यांनी पिपल डेमोक्रेटिक पक्षाचे(पीडीपी) उमेदवार नझीर अहमद खान यांचा १० हजार मतांनी पराभव केला. २०१४ साली याच मतदार संघात अब्दुल्ला यांचा पराभव पीडीपीचे उमेदवार तारिक कर्रा यांनी केला होता. सध्या ते कॉंग्रेस पक्षात सामील झाले आहेत. कर्रा यांच्या राजीनाम्यानंतर ही जागा खाली होती.