मी निर्दोष, मात्र सिध्द करण्याइतके आयुष्य मिळावे - छगन भुजबळ
 महा त भा  17-Jul-2017


 

मुंबई: आज पवार साहेबांच्या मागे आम्ही सारे उभे राहण्याची वेळ आली असताना त्यांनाच आमच्या मागे उभे राहा म्हणून सांगावे लागत आहे. मी निर्दोष आहे मात्र ते सिध्द करेपर्यंत मला मरण येवू नये, अश्या शब्दात या पूर्वाश्रमीच्या आक्रमक असलेल्या माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी निर्वाणीची भाषा केली.

ते म्हणाले की, मला कर्करोग सोडून सारे रोग आहेत त्यामुळे माझे काय होईल माहिती नाही. दरम्यान भुजबळ यांना नंतर त्याच रूग्णवाहिकेतून ऑर्थर रोड तुरूंगात नेण्यात आले. दरम्यान त्याचवेळी राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम यांना देखील भायखळा तुरूंगातून मतदानासाठी आणण्यात आले होते. त्यानी देखील आज मतदान केले.

छगन भुजबळ यांच्या विधानभवनातील उपस्थितीकडे आज साऱ्यांचे लक्ष लागले होते. रुग्णवाहिकेतून विधान भवनात आलेल्या भुजबळांची शाररिक स्थिती फारशी चांगली दिसत नव्हती. तर त्यांना मदतनिसांचा आधार घेवून चालावे लागत होते. यावेळी त्यांना माध्यमांच्या पासून दूर ठेवण्यात आले तरी त्यांच्याशी मतदाना दरम्यान बहुतांश राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या सद्स्यांनी संपर्क केला आणि त्यांची विचारपूस केली. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्यांनी भावपूर्ण शब्दात निरवानिरव करणारे वक्तव्य केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.