एम. व्येंकय्या नायडू रालोआतर्फे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
 महा त भा  17-Jul-2017


 

नवी दिल्ली: राष्ट्रीय लोकशाही आघाडी तथा रालोआतर्फे केंद्रीय शहर विकास मंत्री एम. व्येंकय्या नायडू यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली.

आज राष्ट्रपती पदासाठी निवडणूक झाली. रामनाथ कोविंद यांना रालोआतर्फे उमेदवारी देण्यात आली होती. ते उत्तर भारतातून असल्यामुळे दक्षिण भारतातून उपराष्ट्रपती पदाचा उमेदवार घोषित केला जाईल अशी चर्चा होती. त्यात केंद्रीय शहर विकास मंत्री एम. व्येंकय्या नायडू, महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, आणि निर्मला सीतारामन यांची नावे चर्चेत होती.

मात्र संसदीय समितीने सर्वानुमते एम. व्येंकय्या नायडू यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. एम. व्येंकय्या नायडू हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत आहेत. नायडू हे ४ वेळा राज्यसभेचे खासदार राहिले आहेत, तसेच ते २ वेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष देखील होते. सध्या केंद्र सरकारमध्ये शहर विकास, गृहनिर्माण आणि माहिती आणि प्रसार मंत्री म्हणून ते कार्यरत आहेत.

Embeded Object

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. 

Embeded Object