गोपाल प्रसाद पराजुली नेपाळचे नवे मुख्य न्यायाधीश
 महा त भा  17-Jul-2017

 

काटमांडू (नेपाळ): न्यायमूर्ती गोपाल प्रसाद पराजुली नेपाळचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नेपाळच्या राष्ट्रपती प्रीती विद्या देवी भंडारी यांनी पराजुली यांना गोपनीयतेची शपथ दिली. नेपाळ संसदेच्या विशेष समितीच्या सर्वसम्मतिने गोपाल प्रसाद पराजुली यांची निवड करण्यात आली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश सुशीला करकी यांच्या निवृत्तीनंतर गोपाल प्रसाद पराजुली यांनी या पदाची शपथ घेतली आहे. संसदेच्या परिषदेने २९ जून रोजी पराजुली यांचे नाव पीएचएससीकडे मुख्य न्यायाधीशाच्या सुनावणीसाठी पाठवले होते.

 

त्यामुळे आता संसदेच्या विशेष समितीने गोपाल प्रसाद पराजुली यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याने पराजुली यांची आज नेपाळच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे.