आयपीएस रुपा यांच्या बदलीबाबत येड्डीयुरप्पांची टीका
 महा त भा  17-Jul-2017

शशिकला यांनी तुरुंगात व्हीआयपी वागणूक दिली जात असल्याबाबत खुलासा केल्याने बदली


 

कर्नाटक : शशिकला व्हीआयपी वागणूक प्रकरण उघड करणाऱ्या आयपीएस अधिकारी डी. रुपा यांची बदली करण्यात आली आहे. याबद्दल माजी मुख्यमंत्री बी.एस.येड्डीयुरप्पा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. आज झालेल्या या निर्णयाने डी. रुपा यांची बदली पुढील आदेश मिळेपर्यंत उपमहानिरीक्षक या पदावर करण्यात आली असून ट्राफिक आणि रस्ता सुरक्षा पथकाच्या आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

डी. रुपा यांची बदली करून सिद्धरामय्या यांनी काँग्रेस सरकार भ्रष्टाचाऱ्यांना पाठिंबा देत असल्याचे म्हणत टीका केली आहे. ते म्हणतात, प्रामाणिकपणे काम केल्याची आणि भ्रष्टाचार उघडकीस आणल्याबद्दल अशी कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली करून काँग्रेस सरकारने त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. या बदलीची मी निषेध करतो. तरुंग उपनिरीक्षक या नात्याने रुपा यांनी त्यांची जबाबदारी निभावली होती.

Embeded Object

कोण आहेत आयपीएस अधिकारी डी रुपा ?

जयललिता यांच्या उत्तराधिकारी आणि एआइएडीएमके प्रमुख शशिकला भ्रष्टाचार प्रकरणी सध्या बेंगलुरुच्या परप्पाना अग्रहारा तुरुंगात आहेत. या तरुंगाच्या उपनिरीक्षक म्हणून आयपीएस अधिकारी डी रुपा कार्यरत होत्या.

व्ही. शशिकला यांना तुरुंगात व्हीआयपी दर्जाची वागणूक मिळत असून विशेष जेवणाची व्यवस्था मिळण्यासाठी शशिकला यांनी लाच दिल्याचा आरोप रुपा यांनी केला होता.