श्रीलंका सराव सामन्यात शिखर धवन खेळणार
 महा त भा  17-Jul-2017

 

क्रिकेटपटू मुरली विजय याला मागील सामन्यात दुखापत झाल्यामुळे श्रीलंका येथे होणाऱ्या तीन सराव सामन्यांच्या श्रुंखलेत आता मुरली विजयच्या जागी क्रिकेटपटू शिखर धवन खेळणार आहे अशी माहिती बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटर अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

Embeded Object

ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असतांना मुरली विजय याला डाव्या हाताला दुखापत झाली असल्यामुळे त्याला श्रीलंकामध्ये होणाऱ्या सराव सामन्यात खेळता येणार नसल्याने आता त्याच्या जागी शिखर धवन खेळणार असल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.

 

२६ जुलैपासून भारतीय क्रिकेट संघ तीन सराव सामन्यासाठी श्रीलंकाच्या दौऱ्यावर जाणार आहे. ज्यात पाच सामन्यांची एकदिवसीय श्रुंखला आहे आणि त्यात टी-२० सामने देखील सामील आहेत.