न्यूयॉर्कमध्ये रंगला ‘आयफा’चा रंगतदार कार्यक्रम
 महा त भा  17-Jul-2017

 

‘आयफा २०१७’ पुरस्कार समारंभ नुकताच अमेरिकेतील प्रसिद्ध शहर न्यूयॉर्कमध्ये पार पडला. बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आणि अभिनेत्यांनी त्यांच्या रंगतदार नृत्याविष्काराने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या समारंभाला हॉलीवूड आणि बॉलीवूडमधील दिग्गज कलाकार उपस्थित होते. कलाकारांनी ज्या प्रकारे या कार्यक्रमात प्रेक्षकांचे मनोरंजन केले त्याच सोबत कलाकारांना मिळालेल्या पुरस्कारांचा आनंद देखील कलाकारांनी व्यक्त केला.

Embeded Object

Embeded Object

 

 

या कार्यक्रमात अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता शाहीद कपूर यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘उडता पंजाब’  या चित्रपटासाठी या दोघांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अभिनेत्री सोनम कपूरच्या ‘नीरजा’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार मिळाला आहे. या सोहळ्यात अभिनेत्री तापसी पन्नूला ‘वूमन ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Embeded Object

Embeded Object

‘नीरजा’ या चित्रपटासाठी प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट सह कलाकार आणि एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटासाठी अनुपम खैर यांना सर्वोत्कृष्ट सह कलाकार असा पुरस्कार देण्यात आला. या सोहळ्याचे मुख्य आकर्षण बॉलीवूडमधील प्रसिद्ध गायक, संगीतकार आणि गीतकार ए.आर रेहमान हे होते. त्यांच्या बॉलीवूडमधील २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांना आयफा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Embeded Object

Embeded Object