'पंतप्रधान उज्वला योजने'मार्फत अडीच कोटीहून अधिक गॅस सिलेंडरचे वाटप
 महा त भा  16-Jul-2017


नवी दिल्ली : देशातील प्रत्येक गरीब कुटुंबामध्ये महिलांना स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस सिलेंडर उपलब्ध व्हावा, या उद्देशाने गेल्या वर्षी सुरु करण्यात आलेल्या 'पंतप्रधान उज्वला योजने'अंतर्गत आतापर्यंत अडीच कोटी कुटुंबाना मोफत एलपीजी गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते काल पश्चिम बंगाल येथे योजनेतील अडीच कोटी व्या गॅस सिलेंडरचे वाटप करण्यात आले आहे.

Embeded Object


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर आनंद व्यक्त करत, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आभार व्यक्त केले. तसेच छोट्याशा उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या या योजनेला अडीच कोटींपर्यंत घेऊन गेल्याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या देखील अभिनंदन केले आहे.

Embeded Object

Embeded Object


गेल्या वर्षी १ मे रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. जे लोक स्वतः गॅस खरेदी करू शकतात, अशा नागरिकांनी त्यांना मिळणारी गॅस सबसिडी सोडून द्यावी, जेणे करून याचा फायदा देशातील गरीब कुटुंबातील नागरिकांना होईल, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले होते. भारतातील नागरिकांनी देखील मोदींच्या या विनंतीला मान देत आतापर्यंत १ कोटी ५ लाख ४६ हजार ३८८ नागरिकांनी आपल्या स्वइच्छेने आपली गॅस सबसिडी सोडली आहे. तसेच काही नागरिकांनी आपल्या स्वइच्छेने या योजनेसाठी काही आर्थिक मदत देखील केलेली आहे.


नागरिकांनी सोडलेल्या या सबसिडीतून तसेच केलेल्या आर्थिक मदतीतून 'उज्वला योजने'मार्फत आतापर्यंत देशातील ७०४ जिल्ह्यांमध्ये २ कोटी ५० लाख ८० हजार ४३६ गॅस कनेक्शन गरीब कुटुंबियांना देण्यात आले आहेत. तसेच 'पहल' योजनेमार्फत आतापर्यंत ५३ हजार १९ कोटी रुपयांचा थेट लाभ नागरिकांपर्यंत पोहचला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाच्या या कामिगिरी बद्दल पंतप्रधान मोदींपासून ते सामान्यांपर्यंत अनेकांनी संतोष व्यक्त केला आहे.