अमरनाथ यात्रा : भाविकांच्या बसला अपघात, ११ भाविकांचा मृत्यू
 महा त भा  16-Jul-2017


रामबन (जम्मू-काश्मीर) : अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या भाविकांच्या बस दरीत कोसळल्यामुळे ११ भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ३५ हून अधिका भाविक जखमी झाले आहेत. अमरनाथला जाणाऱ्या मार्गावरील बनिहाल येथे ही घटना घडली असून भाविकांच्या मदतीसाठी स्थानिक नागरिक आणि लष्कराचे जवान घटनास्थळी पोहचले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधान सहाय्यता निधीतून मृतांच्या कुटुंबियांना २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

Embeded Object

Embeded Object

 


आज सकाळी शिबिरामधून अमरनाथ गुहेकडे जात असताना रामबन जिल्ह्यातील बनियाला येथील महामार्गाजवळ हा अपघात घडला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज अनेकांकडून व्यक्त केला जात आहे. गाडीचा आणि भाविकांचा आवाज ऐकून पाठीमागून येत असलेल्या भाविकांनी आपल्या गाड्या थांबून भाविकांच्या मदतीसाठी पुढे धाव घेतली. यानंतर भाविकांसाठी असलेल्या हेल्पलाईनवर फोन करून मदतीसाठी भारतीय जवानांना पाचारण करण्यात आले. जवान आणि भाविकांच्या मदतीने दरीत कोसळलेल्या ४६ नागरिकांना आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहे. यातील ११ नागरिकांच्या जागीच मृत्यू झाला असून ३५ नागरिक गंभीररीत्या जखमी झाले आहे. जखमी नागरिकांना उपचारासाठी तातडीने शिबिराकडे हलवण्यात आले आहे. तसेच दरीत कोसळलेली बस बाहेर काढण्याच्या प्रयत्न केला जात आहे.

 

Embeded Object


दरम्यान अपघाताचे नेमके करण कळू न शकल्यामुळे अनेकांकडून हा दहशतवादी हल्ला असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यामध्ये १७ भाविकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज सकाळी झालेल्या या अपघातामागे देखील दहशतवाद्यांचा हात असल्याची शंका अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच या अपघाताची चौकशी केली जावी, अशी देखील मागणी केली जात आहे.