विम्बल्डन टेनिस स्पर्धा : महिला अंतिम सामन्याला सुरुवात
 महा त भा  15-Jul-2017

 

लंडन येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आजच्या महिला एकेरी अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. जगप्रसिद्ध खेळाडू व्हिनस विल्यम्स आणि स्पेनची गार्बिन मुगुरूझा यांच्यात अंतिम सामना सुरु झाला आहे.

Embeded Object

व्हिनस विल्यम्स आणि गार्बिन मुगुरूझा यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. पहिल्या सेटमध्ये गार्बिन मुगुरूझा ३ तर व्हिनस विल्यम्स  एका फरकाने पुढे आहे. दोघेही खेळाडू आपले उत्तम प्रदर्शन दाखवत आहेत.

 Embeded Object

आजचा खेळ व्हिनस विल्यम्स हिने जिंकला तर ती ६ व्यांदा विम्बल्डन ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली महिला खेळाडू ठरणार आहे. २०००, २००१, २००५, २००७ आणि २००८ मध्ये तिने हा चषक तिच्या नावावर केला आहे. त्यामुळेच आजच्या सामन्यात कोण जिंकणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.