स्पेनची गार्बिन मुगुरूझा पहिल्यांदा ठरली विम्बल्डन विजेता
 महा त भा  15-Jul-2017

 

लंडन येथे सुरू असलेल्या विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आजच्या महिला एकेरी अंतिम सामन्याची विजेता स्पेनची गार्बिन मुगुरूझा ठरली आहे. गार्बिन मुगुरूझाने पहिल्यांदा ही स्पर्धा तिच्या नावावर करून घेतली आहे. जगप्रसिद्ध अमेरिकेची खेळाडू व्हिनस विल्यम्स हिचा पराभव करत मुगुरूझाने हे यश संपादन केले आहे.

Embeded Object

पहिल्या सेटमध्ये मुगुरूझा एका अंकाने विल्यम्सच्या पुढे होती. मात्र काही काळानंतर दोघीही ३-३ अश्या गुणावर येवून सामना पुढे सरकला मात्र पहिल्याच सेटमध्ये मुगुरूझाने विल्यम्सवर ७-५ अशा फरकाने बधत घेऊन पहिला सेट तिच्या नावावर करून घेतला. पहिला सेट खूप अतितटीचा झाल्यावर दुसऱ्या सेटमध्ये विल्यम्सचा अतिशय दारूण पराभव झाला.

Embeded Object

दुसऱ्या सेटमध्ये मुगुरूझाने ६-० अशी बधत घेत विम्बल्डन ग्रँडस्लॅम महिला एकेरी स्पर्धा आपल्या नावर करून घेतली. ही स्पर्धा मुगुरूझाने पहिल्यांदा जिंकली असून याआधी तिने फ्रेंच ओपेन २०१६ ही स्पर्धा जिंकली होती.

Embeded Object