भारतीय वैज्ञानिकांनी शोधला आकाशगंगेचा नवीन समूह
 महा त भा  14-Jul-2017


पुणे : भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो अवकाश क्षेत्रातमध्ये नवनवीन विक्रम प्रस्थापित करत असतानाच, भारतीय वैज्ञानिकांनी आता आणखीन मनाचा तुरा देशाच्या शीरपेचात रोवला आहे. भारतीय वैज्ञानिकांनी अवकाशात एका नवा आकाशगंगेचा समूह (दीर्घिका) शोधला आहे. या दीर्घिकेला 'सरस्वती' असे नाव देण्यात आले आहे. भारतीय वैज्ञानिकांच्या कार्यासाठी जगभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.


पुण्यातील 'इंटर युनिवर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रोनॉमी अॅण्ड अॅस्ट्रोफिजिक्स' (आययूसीएए) या संस्थेत संशोधन करत असलेल्या शिशिर संख्यायन, आययूसीएएचे रिसर्च फेलो प्रतीक दाभाड़े, केरळमधील न्यूमेन कॉलेजचे जो. जॅकब आणि जमशेदपूर येथील नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी विद्यापीठातील प्रकाश सरकार या वैज्ञानिकांनी मिळून या दीर्घिकेचा शोध लावला आहे.

Embeded Object


ही दीर्घिका पृथ्वीपासून ४ हजार दशलक्ष प्रकाशवर्ष दूर असून ती १० अब्ज वर्षांपासून अस्तित्वात असल्याचा दावा आययूसीएएने केला आहे. तसेच तिचा आकार २० दशलक्ष कोटी सूर्या इतका असल्याचे सांगितले जात आहे. या दीर्घकेत शेकडो आकाशगंगा असल्याचे देखील सांगितले जात आहे. तसेच या दीर्घिकेचा शोध हा भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भारतातील अवकाश संशोधनाला आणखीन गती मिळेल असा विश्वास अनेकांकडून व्यक्त केला जात आहे.