रोहित शर्माला डब्ल्यूडब्ल्यूइचे विजेतेपद?
 महा त भा  14-Jul-2017

 

मुंबई : आयपीएलचा तीन वेळा विजेता संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आज ट्वीटरवर एका आगळ्यावेगळ्या फोटोसह दिसून आला. यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा डब्ल्यूडब्ल्यूइ या स्पर्धेच्या विजेत्याला मिळणाऱ्या बेल्टसह दिसून आल्याने भारतीय नेटकऱ्यांमध्ये याबद्दल विशेष आकर्षण दिसून येत आहे.

Embeded Object

वर्ल्ड रेस्टलिंग एन्टरटेन्मेंटचा (डब्ल्यूडब्ल्यूइ) १४ वेळा विजेता ट्रीपल एच या जागतिक स्तरावर प्रसिद्ध खेळाडूने मुंबई इंडियन्सला २२ मे रोजी एक विशेष भेट देत असल्याची घोषणा केली होती. आज ती विशेष भेट मुंबई इंडियन्सला मिळाल्याने कर्णधार रोहित शर्मा आगळ्या आनंदात आहे.

Embeded Object

आयपीएलच्या २२ मे २०१७ रोजी झालेल्या अंतिम सामन्यात रायजिंग पुणे सुपरजायंट या संघाला हरवत मुंबई इंडियन्सने विजेतेपद मिळाल्यावर या संघाला ट्रीपल एचने विशेष भेट देत असल्याबद्दल ट्वीट केले होते. आपले हे आश्वासन पाळत १२ जुलै रोजी हे गिफ्ट नेमके काय असणार आहे याचा उलगडा ट्रीपल एचने केला.

Embeded Object

साक्षात जागतिक स्तरावर मुष्टियोद्धासारख्या खेळात पारंगत ट्रीपल एचने डब्ल्यूडब्ल्यूइचा बेल्ट भेट म्हणून दिला आहे. डब्ल्यूडब्ल्यूइच्या विजेत्यालाच हा मान दिला जातो. विशेष म्हणजे तीन वेळा आयपीएल स्पर्धेचे जेतेपद राखणारा संघ म्हणून अभूतपूर्व यश संपादित केल्याने डब्ल्यूडब्ल्यूइच्या लोगोसोबत मुंबई इंडियन्सचा लोगोदेखील या बेल्टवर झळकत आहे.

 

आयपीएलच्या माध्यमातून अमेरिकन खाजगी मुष्टियुद्ध स्पर्धा डब्ल्यूडब्ल्यूइचे प्रमोशन करण्यात आले होते. भारतामध्ये अनेक तरुणांना या स्पर्धेत रुची असली तरी भारतात या स्पर्धेचे आयोजन अजून एकदाही झालेले नाही. पण भारतीय क्रीडा स्पर्धांमधून जागतिक स्तरावरील खेळांना मोठा चाहता वर्ग मिळत असल्याचे यामधून दिसून येते.