पॅरिस करारावर अमेरिका आपली भूमिका बदलणार?
 महा त भा  14-Jul-2017फ्रांस :  यंदाच्या जी-२० संमेलनात हवामान बदल आणि दहशतवाद हे दोन चर्चेचे मुख्य विषय होते. यामध्ये हवाान बदल या विषयावर पॅरिस करारासंबंधी देखील चर्चा करण्यात आली होती. यावेळी अमेरिकेने पॅरिस करारातून बाहेर पडण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता पॅरिस करारावर अमेरिका आपली भूमिका बदलणार असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी दिले आहेत.

ट्रंप यांनी फ्रांसचे राष्ट्रपति इमेनुएल मैक्रों यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याशी बोलताना पॅरिस कारारावर आपली भूमिका बदलण्याचे संकेत दिले आहेत. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पॅरिस कराराविषयी काहीतरी नक्कीच करण्यात येईल. याविषयी अद्याप सांगता येणार नाही, मात्र पुढे काय होईल ते बघू.." असे म्हणत त्यांनी कदाचित अमेरिका आपली भूमिका बदलेल असा इशारा दिला.

Embeded Object२०१५ मध्ये अमेरिकेने हवामान बदलाविषयी असलेल्या पॅरिस करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तसेच याविषयी एक नवीन करार करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करेल जेणे करुन अमेरिकी व्यापारी आणि उद्योजकांना याने नुकसान होणार नाही, अशी भूमिका अमेरिकेने घेतली होती.

या पत्रकार परिषदेत मैक्रों यांनी पॅरिस करारावर अमेरिकेशी असलेल्या मतभेदांविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, पॅरिस करारावर अमेरिकेच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, मात्र फ्रांस आपल्या भूमिकेवर ठाम आहे. याविषयी फ्रांस आणि अमेरिकेत मतभेद असले तरी देखील या भेटीत मी ट्रंप यांचे मन वळविण्याचे प्रयत्न करेन.

त्यामुळे आता पॅरिस करारातून बाहेर पडलेले अमेरिक पुन्हा एकदा यामध्ये सामिल होणार का? तसेच अमेरिकेची भूमिका बदलली, तर इतर जी-२० देश याबद्दल काय भूमिका घेतील हे बघणे पण महत्वाचे ठरणार आहे.