सायबर क्राईमवर आळा घालण्यासाठी इस्रोचे नवे सॉफ्टवेअर
 महा त भा  14-Jul-2017

 

देशातील वाढत्या सायबर क्राईमचा विचार करता भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थांत ‘इस्रो’ ने दिल्ली येथील पोलिसांसाठी एक नवीन तंत्रज्ञानाने अवगत सॉफ्टवेअर  तयार केले आहे. देशात पहिल्यांदा पोलिसांसाठी स्वदेशी बनावटीचे सॉफ्टवेअर ‘इस्रो’ कडून तयार करण्यात आले आहे.

 

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून दिल्लीला पूर्णपणे कंट्रोल रूमला जोडण्यात आले आहे. या सॉफ्टवेअरमुळे गुन्हेगारीप्रवण क्षेत्रावर नजर ठेवणे सोपे होणार आहे. हे सॉफ्टवेअर सायबर क्राईम आणि ऑनलाईन गुन्हे थांबवण्यासाठी मदत करेल. ई-व्यवहार, ऑनलाईन छेडछाड, नेट बँकिंग, ऑनलाईन खरेदी आणि ई-वॉयलेट यासंबंधी घडणारे गुन्हे यावर या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लक्ष ठेवता येईल.

 

दिल्ली येथील १३ वरिष्ठ अधिकारी या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. सध्या दिल्ली येथील प्रत्येक पोलीस ठाण्यात हे सॉफ्टवेअर लावले गेले असून काही दिवसांनी दिल्ली पोलिसांच्या फोनवर देखील हे सॉफ्टवेअर लावले जाणार आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नक्कीच गुन्हेगारीप्रवण क्षेत्रावर नजर ठेवणे सोपे होणार आहे.