ऑपरेशन क्लीन मनी - २ ऱ्या टप्प्यात ५.५६ लाख लोकांनी भरली रोख रक्कम
 महा त भा  14-Jul-2017


 

नवी दिल्ली: वित्तीय व्यवहारविषयक तपशीलावरुन ऑपरेशन क्लीन मनीच्या दुसऱ्या टप्पयात ५ लाख ५६ हजार लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम भरल्याचे आयकर विभागाने उघड केले आहे. विमुद्रीकरणाच्या काळात या व्यक्तींनी मोठया प्रमाणावर रोख रक्कमा जमा केल्याचे स्पष्ट झाले. त्याव्यतिरिक्त ऑपरेशन क्लीन मनीच्या पहिल्या टप्प्यात ई-पडताळणी प्रक्रियेत तब्बल १ लाख ४ हजार लोकांनी आपली बँक खाती उघड न केल्याचे स्पष्ट झाले आहे.

यासंदर्भातील संपूर्ण माहिती https://incometaxindiaefiling.gov.in या पोर्टलवर उपलब्ध आहेत. पॅनकार्डधारक या विभागात रोख व्यवहार २०१६ या दुव्याच्या आधारे याबाबतचे तपशील पाहू शकतात प्रमाणापेक्षा जास्त रोख रक्कम भरणारे सर्व करदाते यासंदर्भातील ऑनलाईन स्पष्टीकरण सादर करु शकतात. अशा सर्व करदात्यांना ई-मेल आणि एसएमएसच्या माध्यमातून स्पष्टीकरण देण्याची सूचना देण्यात आली आहे.