बीएसएनल पुरविणार २.५ लाख ग्रामपंचायतींना ब्रॉडबँड सेवा
 महा त भा  14-Jul-2017


 

मुंबई: केंद्रीय संदेशवहन राज्यमंत्री मनोज सिन्हा यांच्या हस्ते नॅशनल सुपर एक्स्प्रेस इन्फोर्मेशन हायवे- नेक्स्ट जनरेशन आणि ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क टेक्नॉलॉजी या दोन योजनांचा लोकार्पण कार्यक्रम आज मुंबई येथे संपन्न झाला.

या कार्यक्रमात बोलताना सिन्हा म्हणाले की, डिसेंबर २०१८ पर्यंत सरकारने अडीच लाख ग्रामपंचायतींमध्ये १०० एमबीपीएस ब्राडबँड कनेक्टिव्हिटी पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवले असून यांपैकी आतापर्यंत जवळपास एक लाख ग्रामपंचायतींना ५०० पेक्षा जास्त नेट टू नेट कनेक्टिव्हिटी पोहोचली आहे.

एनजीओटीएन ही ३३० कोटी रुपये लागत मूल्याची परियोजना १०० शहरांमध्ये लागू करण्याचे सरकारने ठरवले असून या प्रकल्पाद्वारे ९९.९९% कृती क्षमता केंद्र २४X७ तत्वावर बंगळूरू येथे चालू करण्यात येणार आहे. १० जी पासून १०० जी ऑप्टिकल फायबरची क्षमता वाढवणे असे बीएसएनएलच्या या प्रकल्पाचे उद्दिष्ट असून बीएसएनएलच्या किरकोळ ग्राहकांना लँडलाईन, एफटीटीएच आणि मोबाईल सेवांच्या क्षमतेत वाढ करुन मिळेल. या सोयींचा उपयोग व्यापारी उपक्रमांना लीज लाईनमध्ये अल्ट्रा हाय कॅपॅसिटी वाढविण्यासाठी मदत होईल.

आत्तापर्यंत १०० शहरांपैकी ४५ शहरांमध्ये एनजीओटीएन सेवा आजपासून सुरु झाली असून उर्वरित ५५ शहरांमध्ये मार्च २०१८ पासून ही सेवा उपलब्ध होईल.

मनोज सिन्हा पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधुनिक डिजिटल भारताच्या स्वप्नाला पूर्ण करण्याच्या उद्दिष्टाने भारताची सुपर हायवेकडे वाटचाल चालू असून उपरोक्त ३३० कोटी लागत मूल्यांच्या योजनेच्या तीन टप्प्यांपैकी दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यांनी यावेळी बीएसएनएलने ग्राहकाभिमुख नॅशनल सुपर एक्स्प्रेस इन्फोर्मेशन हायवे- नेक्स्ट जनरेशन आणि ऑप्टिकल ट्रान्सपोर्ट नेटवर्क टेक्नॉलॉजी या योजनांच्या पूर्णतेसाठी घेत असलेल्या परिश्रमांचे कौतुक केले.

Embeded Object