पुण्याच्या नाट्यगृहांची दुरवस्था मुक्ता बर्वे हिने आणली समोर
 महा त भा  13-Jul-2017

 

महाराष्ट्राला मोठा रसिक प्रेक्षक लाभला आहे मात्र नाटक पाहणारा प्रेक्षक नाटक पाहून तर नाट्य समृद्ध होतो मात्र ज्या नाट्य गृहात तो जातो तेथील दुरवस्था पाहून तो संतापजनक भावनेने चलबिचल होतो. अशीच एका नाट्य गृहाची दुरवस्था मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने लोकांपुढे आणली आहे. मुक्ताने तिच्या फेसबुकवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने नाटक गृहाची दुरवस्था आणि बेजबाबदारपणा लोकांपुढे आणला आहे.

एका नाट्य गृहात मुक्ता गेली असतांना तिला त्या नाट्य गृहात अतिशय घाण दिसली असता तिने त्या नाट्य गुहाच्या शौचालयाचे छायाचित्र तिच्या फेसबुक अकाऊंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचविले असून यावर अतिशय संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. वरील पोस्टवरून तिने नाट्य गृहांचा बेजबाबदारपणा आणि दुरवस्था प्रकर्षाने लोकांपुढे आणला आहे.