अबब, व्हिडिओला आठ लाखाहून अधिक व्ह्यूज! असं जॅकलिननी केलं तरी काय?
 महा त भा  13-Jul-2017श्रीलंकन अभिनेत्री जॅकनिल फर्नांडिस नेहमीच तिच्या अतरंगी करामतींमुळे आणि तिच्या एकूणच ‘हॉट’नेसमुळे सातत्याने चर्चेत असते. याच आठवड्यात तिच्या ‘ए जंटलमेन’ या आगामी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. या चित्रपटातील काही हॉट दृश्यांमुळे ती चर्चेत आली होती. आता ती चर्चा संपते न संपते तोच काल मध्यरात्री जॅकलिन फर्नांडिसने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्याला अवघ्या काही तासात आठ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळालेत.


‘पोल डान्सिंग’चा ट्रेंड आपल्याकडे काही प्रमाणात रूजू पाहतो आहे. काही दिवसांपूर्वी इशा गुप्ताने अशा प्रकारच्या पोल डान्सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला होता. आता तिच्यानंतर या आकर्षित करून घेणार्‍या ट्रेंडमध्ये जॅकलिननेही उडी घेतली आहे. तिनी काल मध्यरात्री फेसबुकवरून ‘पोल डान्स’ करत असलेला व्हिडिओ टाकला आहे. ‘बर्निंग दी मिड नाईट ऑईल’ अशी कॅप्शन देऊन या पोस्टमध्ये तिनी तिची ट्रेनर रोकसोलाना चुबेनको हिला टॅगदेखील केलं आहे. सध्या हा व्हिडिओ आठ लाख 31 हजार 500 नेटिझन्सनी बघितला असून त्यावर अकराशेहून अधिक प्रतिक्रिया आल्या आहेत.

Embeded Object

जॅकलिनचे सिद्धार्थ मल्होत्रा सोबतचा ‘ए जंटलमेन’ व वरून धवन बरोबरचा ‘जुडवा -2’ असे दोन चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होत आहेत. यातील ‘ए जंटलमेन’मध्ये तिच्या लेखी बर्‍यापैकी अ‍ॅक्शन सीन्स आल्याचे दिसून येते. कदाचित हा ‘पोल डान्सिंग’चा व्हिडिओ ‘ए जंटलमेन’ या चित्रपटाच्या प्रमोशनचाच एक भाग असू शकतो.